Join us  

साकीब नाचन उच्च न्यायालयात

By admin | Published: May 28, 2016 1:42 AM

बंदी घातलेल्या सिमीचा माजी सचिव साकीब नाचन याने व्हीएचपीचे कार्यकर्ते आणि वकील मनोज रायची हत्या व हत्येचा कट रचल्याप्रकरणाच्या खटल्यावर स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात

मुंबई : बंदी घातलेल्या सिमीचा माजी सचिव साकीब नाचन याने व्हीएचपीचे कार्यकर्ते आणि वकील मनोज रायची हत्या व हत्येचा कट रचल्याप्रकरणाच्या खटल्यावर स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी असलेला साकीब नाचन व्हीएचपीचे कार्यकर्ते आणि वकील मनोज राय यांच्या हत्येप्रकरणीही आरोपी आहे. राय यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे. राय यांची ३ आॅगस्ट २०१२ रोजी भिवंडी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ६ मे रोजी विशेष मोक्का न्यायालयाने आरोप निश्चिती केली होती.