दहिसरमध्ये राबवली जाते सक्षम_ती मोहिम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 03:51 PM2020-12-26T15:51:46+5:302020-12-26T15:52:03+5:30
Saksham_ti campaign : अत्याचारीत पीडित महिला व युवतींच्या तक्रारींचे करणार निवारण
मुंबई: अत्याचारीत पिडित महिला व युवतींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिवसेना सरसावलो आहे. शिवसेनेच्या युवासेना युवती व मुंबई पोलिसांची एक संयुक्त मोहिम सध्या पश्चिम उपनगरातील गोरेगांव ते दहिसर विभागात राबवली जात आहे. युवासेना प्रमुख,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना शाखा क्र.६ तर्फे " सक्षम- ती " कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच दहिसर येथील त्रिमुर्ती स्टुडिओच्या प्रांगणात करण्यात आले होते.
सुमारे ५०० महिलांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उपनेत्या व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी याच्या प्रमुख मार्गदर्शनाने , युवासेना राष्ट्रिय कार्यकारीणी व मुंबई विद्यापिठ सिनेट सदस्य शितल देवरुखकर - शेठ यांच्या संकल्पनेनुसार संपन्न हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..
नगरसेवक व विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर व युवती विभाग अधिकारी धनश्री कोलगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना दहिसर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरिक्षक सुविधा पुलेल्लू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, उपविभागप्रमुख विनायक सामंत, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले, उपविभाग संघटक दीपा पाटील, शाखाप्रमुख प्रविण कुवळेकर , महिला शाखा संघटक दर्शना भरणे, युवतीसेना उपविभाग अधिकारी अद्वैता पंजारी,
व सर्व युवासेनेचे पदाधिकारी व ५०० महिला उपस्थित होत्या.