दहिसरमध्ये राबविली जाते ‘सक्षम_ती’ मोहीम
अत्याचारीत पीडित महिला व युवतींच्या तक्रारींचे करणार निवारण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्याचारीत पीडित महिला व युवतींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसेनेच्या युवासेना युवती व मुंबई पोलिसांची एक संयुक्त मोहीम सध्या पश्चिम उपनगरातील गोरेगांव ते दहिसर विभागात राबविली जात आहे. युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना शाखा क्र.६ तर्फे ‘सक्षम ती’ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच दहिसर येथील त्रिमूर्ती स्टुडिओच्या प्रांगणात करण्यात आले होते.
सुमारे ५०० महिलांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उपनेत्या व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी याच्या प्रमुख मार्गदर्शनाने, युवासेना राष्ट्रिय कार्यकारिणी व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शितल देवरुखकर-शेठ यांच्या संकल्पनेनुसार संपन्न हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नगरसेवक व विधि समिती अध्यक्ष हर्षद कारकर व युवती विभाग अधिकारी धनश्री कोलगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना दहिसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुविधा पुलेल्लू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, उपविभागप्रमुख विनायक सामंत, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले, उपविभाग संघटक दीपा पाटील, शाखाप्रमुख प्रवीण कुवळेकर, महिला शाखा संघटक दर्शना भरणे, युवतीसेना उपविभाग अधिकारी अद्वैता पंजारी व सर्व युवासेनेचे पदाधिकारी व ५०० महिला उपस्थित होत्या.
---------