अ‍ॅसिड पीडितांसाठी ‘सक्षमा’ उपक्रम

By admin | Published: March 5, 2017 12:44 AM2017-03-05T00:44:32+5:302017-03-05T00:44:32+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग अ‍ॅसिड हल्ल्यामुळे बाधित झालेल्या पीडितांसाठी समाजाच्या मदतीने पुनर्वसन कार्यक्रम घेत आहे.

'Sakshma' initiative for acid sufferers | अ‍ॅसिड पीडितांसाठी ‘सक्षमा’ उपक्रम

अ‍ॅसिड पीडितांसाठी ‘सक्षमा’ उपक्रम

Next

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग अ‍ॅसिड हल्ल्यामुळे बाधित झालेल्या पीडितांसाठी समाजाच्या मदतीने पुनर्वसन कार्यक्रम घेत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि दिव्यज् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया, वरळी येथे ‘कॉन्फिडन्स वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. समाजात अ‍ॅसिड पीडित व्यक्तींना प्रतिष्ठा मिळावी म्हणून नामांकित व्यक्ती, उद्योजक, कलाकार यांच्यासोबत त्यांचा ‘कॉन्फिडन्स वॉक’ होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अ‍ॅसिड पीडितांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, नोकरी मिळण्यास सहकार्य व्हावे हे उद्देश आहेत. या कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sakshma' initiative for acid sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.