Join us

मेट्रो -२ बी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरखर्च चालविणे झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 2:07 AM

डी.एन. नगर ते मंडाले या मेट्रो २बी मार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे वेतन रखडले आहे.

- ओम्कार गावंड मुंबई : डी.एन. नगर ते मंडाले या मेट्रो २बी मार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे वेतन रखडले आहे. यामुळे अभियंत्यांसह इतर कर्मचारी अशा तीनशेहून अधिक जणांना घरखर्च चालविणेदेखील कठीण होऊन बसले आहे. एमएमआरडीएने राधा कन्स्ट्रक्शन कंपनी (आरसीसी) या कंत्राटदाराला डी.एन. नगर ते चेंबूर डायमंड गार्डन या मेट्रो मार्गाचे कंत्राट दिले होते. परंतु कंत्राटदाराने संथ गतीने काम केल्यामुळे आत्तापर्यंत या मार्गावरील केवळ दोन ते तीन टक्केच काम पूर्ण झाले आहे. परिणामी, एमएमआरडीएने आरसीसीचे कंत्राट रद्द केले.

मात्र आरसीसी कंपनीमध्ये काम करणाºया कर्मचाºयांचे कंपनी प्रशासनाने वेतन न दिल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून कर्मचाºयांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. या प्रकरणी प्रकल्पात काम करणाºया अभियंत्यांनी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएला टिष्ट्वटसुद्धा केले होते. तरीदेखील याची कोणीच दखल न घेतल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे. यावर आम्ही कंत्राट दिलेले होते. यामुळे आमचा आणि कंत्राटदाराच्या कर्मचाºयांचा संबंध नाही, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव म्हणाले.

आरसीसीमध्ये काम करणारे काही कर्मचारी नोकरी सोडून निघून गेले. परंतु कित्येक कर्मचारी अजूनही पगार मिळण्याच्या प्रतीक्षेत कंपनीच्या कार्यालयात दररोज येत आहेत. एमएमआरडीएने कंत्राट रद्द केल्याने आरसीसीचे बीकेसी व मंडाळे येथील कास्टिंग यार्ड कार्यालय बंद झाले. यामुळे कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने सर्व कर्मचाºयांचे वेतन लवकरात लवकर द्यावे; अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे.

या मार्गावरील कामाला पाच ते सहा महिन्यांपासून पूर्णत: ब्रेक लागल्यामुळे येथील लोखंडी साहित्य तसेच विविध उपकरणे धूळ खात पडली आहेत. डी. एन. नगर ते चेंबूर डायमंड गार्डन यादरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्याकरिता कंत्राटदाराने रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत. या बॅरिकेट्सच्या आतमध्ये विविध उपकरणे, लोखंडी शिगा व इतर लोखंडी साहित्य उघड्यावर पडले आहे. तसेच काही ठिकाणी मोठे खड्डेदेखील मारून ठेवले आहेत. परंतु येथे सुरक्षारक्षक तैनात नसल्याने गर्दुल्ले जाऊन बसत आहेत. तेव्हा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मेट्रोचे काम सुरू असल्याने चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यात पाच ते सहा महिन्यांपासून काम बंद असल्याने कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे.

अपघाताची भीती

काही ठिकाणी बॅरिकेट्सच्या मधल्या जागेतून नागरिक रस्ता ओलांडत आहेत. अशावेळी बॅरिकेट्सच्या आडून येणारे वाहन न दिसल्याने अपघात घडत आहेत. मेट्रोचे काम सुरू असल्याने चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही होत आहे.

टॅग्स :मेट्रोमहाराष्ट्र सरकारमुंबईकर्मचारी