मुंबई : सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आॅक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी २४ आॅक्टोबरला देण्यात येणार आहे. वित्त विभागाने बुधवारी तसा आदेश काढला आहे. आॅक्टोबरचे नोव्हेंबरमध्ये मिळणारे वेतन दिवाळीच्या तीन दिवस आधी म्हणजे २४ आॅक्टोबरला दिले जाईल. निवृत्ती वेतनाबाबतही हाच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाºयांनाही पेन्शन मिळेल.जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी यांनाही दिवाळीपूर्वी वेतन/निवृत्तीवेतन दिले जाईल.वाढीव महागाई भत्त्यापासून वंचितचमहागाई भत्त्यातील वाढ राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाºयांना तत्काळ लागू करण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. केंद्र सरकारने अधिकारी, कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यात १ जुलै, २०१९ पासून ५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे भत्त्याचा दर १७ टक्के झाला आहे. केंद्रानुसार महागाई भत्ता देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार, ही ५ टक्के वाढ आॅक्टोबर, २०१९ पासून लागू करावी आणि जानेवारीपासून ९ महिन्यांची थकबाकीही दिवाळीपूर्वी द्यावी, अशी महासंघाची मागणी आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; वाढीव महागाई भत्त्यापासून वंचितच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 6:04 AM