Join us

वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टच्या १००  कर्मचाऱ्यांना चार महिन्यानंतर पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 4:25 PM

गेल्या चार महिन्याच्या पगार त्यांच्या खात्यात नुकताच जमा झाल्याने येथील कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : सध्या कोरोनामुळे गेल्या 24 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने देशाची अर्थव्यवस्था व जनजीवन ठप्प झाले आहे तर अनेकांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवयचा व घर कसे चालवायचे याची चिंता सर्वांनाच भेडसावत आहे. वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टीच्या अंतर्गत वादामुळे  येथील 100 कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्याच्या पगार त्यांच्या खात्यात नुकताच जमा झाल्याने येथील कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अंधेरी पश्चिम,सात बंगला येथील वर्सोवा एज्युकेशन ट्रस्टचे येथे सुमारे 100 कर्मचारी आणि 3500 विद्यार्थी असलेली सदर शिक्षण संस्थेची शाळा व महाविद्यालय असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव यांनी लोकमतला या शुभवर्तमानाची माहिती दिली. 

3 जानेवारी 2020 रोजी या शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांमधील वादाचे कारण देत कॅनरा बँक,वर्सोवा ब्रांचने या संस्थेच्या ट्रस्टची सर्व खाती गोठवली होती. कर्मचार्‍यांचा पगार जाहीर करावा व वैधानिक देयके द्याव्यात या निर्देशासाठी ट्रस्टने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अपील केले परंतु दुर्दैवाने कोणताही आदेश कुलूपबंद झाल्यास सुनावणी स्थगित झाली. जरी सर्व विश्वस्तांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले की, कर्मचार्‍यांना पगाराची देय देण्याबाबत त्यांच्यात कोणताही वाद नाही. परंतु कोरोना महामारीच्या या संकटामध्येसुद्धा त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडून आदेश मागितला.येथील बँक अधिकाऱ्यांची असहकार सक्ती अरुण देव यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना समजावून सांगितली. या लॉकडाऊनच्या या प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्वाच्या टप्प्यात कर्मचार्‍यांच्या आवाहनासमवेत सर्व कर्मचार्‍यांकडून होणाऱ्या अडचणी समजून घेत कोरोनाचा या  टप्प्यात सर्वांना पगार द्यायला हवा अशी आक्रमक भूमिका खासदार शेट्टी यांनी घेतली.

याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून येथील 100 कर्मचाऱ्यांचे गेली चार महिने रखडलेले पगार लवकर देण्याचे आदेश संबंधित बँक अधिकाऱ्यांना देण्याची विनंती केली.खासदार गोपाळ शेट्टी जी यांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना केवळ पत्रच पाठवले नाही, तर आरबीआयच्या गव्हर्नरांशी व महाव्यवस्थापकांशी त्यांनी थेट संपर्क साधला.येथील बँक अधिकाऱ्यांची असहकार वृत्तीची कहाणीच त्यांनी कथन केली.शेट्टी यांच्या दणक्याने चक्र वेगाने फिरली,आणि अखेर येथील  येथील 100 कर्मचाऱ्यांना चार महिन्याच्या रखडलेला पगार त्यांच्या खात्यात नुकताच जमा झाला अशी माहिती अरुण देव यांनी दिली.याकामी राज्याचे परिवहन मंत्री अँड.अनिल परब,खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखिल मोलाचे सहकार्य केले अशी माहिती अरुण देव यांनी दिली. खासदार शेट्टी  यांनी कर्मचार्‍यांना कोरोनाविरूद्ध लढाई सन्मानाने लढायला लावण्यासाठी आर्थिक कमतरतेपासून मुक्त केले अशी बोलकी प्रतिक्रिया येथील सर्व विश्वस्त व कर्मचाऱ्यांनी शेवटी व्यक्त केली.

टॅग्स :पैसाशाळामुंबईमहाराष्ट्र