वॉटर व्हेडिंग मशीन कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 02:02 AM2019-03-08T02:02:07+5:302019-03-08T02:02:13+5:30
वॉटर व्हेडिंग मशीन कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नाही.
मुंबई : वॉटर व्हेडिंग मशीन कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे घर चालविणे कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. कर्मचाºयांनी आपल्या मागण्या नुकत्याच रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन मांडल्या. मात्र केवळ आश्वासनावर बोळवण करण्यात आल्याची खंत कर्मचाºयांनी व्यक्त केली.
इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिज्म कॉपोर्रेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांनी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेडिंग मशीन बसविल्या आहेत. या मशीनवर काम करणाºया कर्मचाºयांना १२ तास काम करावे लागते. सुरुवातीला ८ तास काम करावे लागेल असे सांगून त्यानंतर मात्र त्यांना १२ तासांसाठी नेमण्यात आले. मागील दोन वर्षांपासून काम करत आहोत. सुरुवातीला वेळेवर पगार मिळत होता. मात्र त्यानंतर ७ तारखेला होणारा पगार १३ ते १४ तारखेला मिळू लागला. हळूहळू दोन महिन्यांनी एका महिन्यांचा पगार मिळत होता. मात्र आता मागील चार महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर संबंधितांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. तरीही पगार आणि इतर मागण्यांबाबत केवळ आश्वासनावर बोळवण करण्यात आल्याची खंत कर्मचाºयांनी व्यक्त केली. सीएसएमटी ते टिटवाळा स्थानकावर एक ते दोन कर्मचारी वॉटर व्हेडिंग मशीनवर काम करत आहे. कर्मचाºयांना त्यांच्या आताच्या महिन्यासह मागील चार महिन्यांचा पगार लवकरात लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे राहूल सिंग राजपूूत यांनी सांगितले़
>आमची संघटना कर्मचाºयांसाठी लढत आहे. कर्मचाºयांचे प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी आहे. प्रत्येक कर्मचाºयांवर त्यांचे घर चालत असते. मात्र मागील चार महिन्यांपासून कर्मचाºयांना पगार न मिळते, ही बाब खेदनीय आहे. वॉटर व्हेडिंग मशीनच्या कर्मचाºयांना आमचा पाठिंबा असून त्यांच्या समस्या सोडवू.
- वेणू नायर, महामंत्री, नॅशनल युनियन मजदूर संघ