खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना पगार वाढ
By स्नेहा मोरे | Published: August 20, 2023 08:20 PM2023-08-20T20:20:36+5:302023-08-20T20:20:44+5:30
मुंबई - पालिका कर्मचाऱ्यांना यंदा वर्षांच्या सुरुवातीला वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला, त्यानंतर पालिका पालिका मान्यताप्राप्त अनुदानित खासगी ...
मुंबई - पालिका कर्मचाऱ्यांना यंदा वर्षांच्या सुरुवातीला वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला, त्यानंतर पालिका पालिका मान्यताप्राप्त अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्नही प्रलंबित होता. त्यावर तोडगा काढत आता या वेतनवाढीला पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.
खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार पुढील महिन्यापासून वाढणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना ४२ टक्के वाढीव दराने महागाईभत्ता आणि २७ टक्के घरभाडे मिळणार आहे. या पगारवाढीची अंमलबजावणी सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे
पालिका कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून ४२ टक्के दराने वाढीव महागाईभत्ता लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता महापालिका मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांन महागाईभत्ता लागू करण्याचा आणि २७ टक्के घरभाडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा खर्च पालिकेने उचलला आहे.