Join us

एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 8:52 PM

एकूण १६,८०० चा वाढीव भत्ता त्याचसोबत ५ लाखाचा आरोग्य विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

श्रीकांत जाधव मुंबई  - प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा हक्क आणि अधिकार मिळाला हवा म्हणून कार्यरत असलेल्या एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेच्या वाटाघाटीला मोठे यश मिळाले आहे. संघटनेच्या प्रयत्नाने कर्मचाऱ्यांचे ३ वर्षासाठीचे नियुक्ती करार करण्यात आला आहे. त्यात कर्मचाऱ्यांना एकूण ८६०० रुपये पगार वाढ मिळाली आहे.

एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून ओमेगा एंटरप्राईझेस ह्या कंपनी मार्फत एअरपोर्टमध्ये अंतर्गत स्टाफ म्हणून अनेक सफाई कामगार ,चालक, कार्गो लोडर आणि लिफ्ट ऑपरेटर अशा विविध पदांवर कर्मचारी काम करतात. यंदा सरमळकर यांच्या प्रयत्नाने कर्मचाऱ्यांचे ३ वर्षासाठीचे नियुक्ती करार करण्यात आला. त्यात प्रत्येकी रुपये ५८०० चा वाढीव भत्ता, २८०० चा डीए असे एकूण ८६०० रुपये पगारात वाढवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २०२१ ते २०२७ पर्यंत एकूण १६,८०० चा वाढीव भत्ता त्याचसोबत ५ लाखाचा आरोग्य विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या एअरपोर्ट एव्हिएशन संघटनेचे नेते कुणाल सरमळकर यांच्या या वाटाघाटीमुळे कल्याणकारी निर्णय कामगार संघटनेच्या माध्यमातून घेण्यात संघटनेला यश मिळाले आहे.