कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्यांना आधी वेतन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:34 PM2020-05-07T20:34:25+5:302020-05-07T20:35:08+5:30

कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी एसटीचे धोरण 

Salary before those present on duty | कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्यांना आधी वेतन 

कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्यांना आधी वेतन 

Next

 

मुंबई : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून मुंबई महानगरातून विभागातून एसटी बस चालविण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवेतील विशेष फेऱ्या कमी होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधी वेतन देण्यात येणार असल्याचे धोरण एसटी महामंडळाने सुरू केले आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी बसची खूप मदत होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून एसटीची सेवा सुरु आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने एसटीच्या फेऱ्यावर परिणाम होतो. एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक कर्मचारी अनुपस्थितीत आहे. यासाठी बुधवारी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतन संबंधित परिपत्रक काढले आहे. यामधून लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे २०२० या महिन्याचे वेतन देण्यात यावे. उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्यांचे वेतन राज्य सरकारकडून प्रलंबित असलेल्या सवलत मूल्याची रक्कम प्राप्त झाल्यावर वेतन देण्यात यावी, असे धोरण एसटी महामंडळाकडून राबविल्यात येणार आहे. 

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे अर्थचक्र बिघडले आहे. कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मार्च महिन्याचा वेतनासाठी एसटी महामंडळाने सवलतीचे ३०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारला केली होती. मात्र त्यातील १५० कोटी एसटी महामंडळाला देण्यात आले होते. त्या माध्यमातून मार्च महिन्याचे वेतन सरकारच्या निर्णयाप्रमाणे देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडे सवलतीचें एकूण ५४८  कोटीपैकी आता ३९८ कोटी शिल्लक आहे. मात्र आता एप्रिल आणि मे महिन्याचे एसटी कामगारांच्या वेतन सरकारच्या सवलतींच्या पैशांवर अवलंबून आहे. त्यात अनेक एसटी कर्मचारी कर्तव्यावर येत नाही. त्यामुळे एसटीचा अत्यावश्यक फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 

---------------------------

मागील तीन दिवसापासून भिवंडी, कल्याण ,कुर्ला नेहरुनगर,अर्नाळा, परळ या आगारात चालक, वाहक उपस्थिती कमी झाली आहे. यासह आता विविध जिल्हात अडकून पडलेल्या नागरिकाना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बसेस सज्ज झाल्या आहे, मात्र कर्मचारी उपस्थिती नाही. यासाठी एसटी महामंडळाने हे नवीन धोरण आखले आहे. 

---------------------------

 

Web Title: Salary before those present on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.