Join us

बिबट्याची कातडी आणि अस्वलाच्या नखांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:08 AM

त्रिकूट जाळयात, गुन्हे शाखेची कारवाईबिबट्याची कातडी आणि अस्वलाच्या नखांची विक्रीत्रिकूट जाळ्यात; गुन्हे शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्क...

त्रिकूट जाळयात, गुन्हे शाखेची कारवाई

बिबट्याची कातडी आणि अस्वलाच्या नखांची विक्री

त्रिकूट जाळ्यात; गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बिबट्याची कातडी आणि अस्वलाच्या नखांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकूटाला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. आरोपी त्रिकूटाकड़ून अस्वलाची आठ नखे मिळून आली आहेत.

भांडूप पम्पिंग बसस्थानकात काही जण वन्यप्राण्यांचे कातडे आणि नखांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ला मिळाली. त्यानुसार प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत बिबट्याचे कातडे, अस्वलाची आठ नखे मिळून आली.

शकील रफीक अन्सारी (४१), नाजिर अब्दुल रेहमान शेख (४८) या दोघांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.