‘त्या’ आठ घरांची म्हाडा करणार लॉटरीद्वारे विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:49 AM2019-10-10T01:49:56+5:302019-10-10T01:50:08+5:30
म्हाडाचे मुंबई मंडळ या घरांचा समावेश येत्या लॉटरीमध्ये करून सामान्यांसाठी वाजवी दरामध्ये विक्री करणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून मिळणाऱ्या खासगी विकासकांच्या घरांची विक्री म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत करण्यात येईल. मुंबईत जुहूतील इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाच्या दुरुस्ती आणि मंडळाला खासगी विकासकाकडून आठ घरे मिळणार आहेत. म्हाडाचे मुंबई मंडळ या घरांचा समावेश येत्या लॉटरीमध्ये करून सामान्यांसाठी वाजवी दरामध्ये विक्री करणार आहे.
यंदा पहिल्यांदाच या घरांचा समावेश म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये होणार आहे. यातील काही घरांचे क्षेत्रफळ ७५० चौरस फुटांच्या आसपास आहे. त्यांची बाजारभावानुसार किंमत कोट्यवधीत असेल. मात्र बाजारभावापेक्षा कमी किमती असतील असे म्हाडाचे मत आहे. यातील काही घरांचे क्षेत्रपळ ३०० चौ. फूट असेल. २७ सप्टेंबरला ही घरे दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून मुंबई मंडळाकडे सोपविली असून, यामध्ये एकूण दोन कार पार्किंग, आठ सदनिका यांचा समावेश आहे.