कोंबडी पुरवठा करणाऱ्या गाड्यातील मेलेल्या कोंबड्यांची होतेय मुंबईत विक्री 

By धीरज परब | Published: August 27, 2023 10:28 PM2023-08-27T22:28:42+5:302023-08-27T22:29:27+5:30

 काशीमीरा उड्डाणपूल खाली नमस्कार पेट्रोलपंप समोर कोंबड्यांचा पुरवठा करून आलेल्या गाड्या उभ्या राहतात

Sale of dead chickens in chicken supply trucks in Mumbai | कोंबडी पुरवठा करणाऱ्या गाड्यातील मेलेल्या कोंबड्यांची होतेय मुंबईत विक्री 

कोंबडी पुरवठा करणाऱ्या गाड्यातील मेलेल्या कोंबड्यांची होतेय मुंबईत विक्री 

googlenewsNext

धीरज परब / मीरारोड - काशीमीराउड्डाणपूल खाली उभ्या राहणाऱ्या कोंबड्या पुरवणाऱ्या गाड्यां मधील मेलेल्या कोंबड्या गोळा करून प्रत्येकी ३० रुपये प्रमाणे त्या मुंबईच्या वांद्रे - खार भागात विकणाऱ्या इसमास मनसे कार्यकर्त्यांनी पकडले . मेलेल्या कोंबड्या विकून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात असताना पोलिसांनी मात्र अन्न व औषध प्रशासनास सांगा असे म्हणत कारवाईस नकार दिल्याचा आरोप मनसैनिकांनी केला . 

 काशीमीरा उड्डाणपूल खाली नमस्कार पेट्रोलपंप समोर कोंबड्यांचा पुरवठा करून आलेल्या गाड्या उभ्या राहतात . सदर गाड्यां मध्ये असलेल्या मेलेल्या कोंबड्या ह्या गोळा करून त्याची विक्री केली जात असल्याचे मनसेचे विभागीय सचिव सचिन जांभळे यांना समजल्याने रविवारी त्यांनी उपविभाग अध्यक्ष करण हरिजन , विलास राक्षे  सह पळत ठेवली होती . त्यावेळी दोघेजण गाड्यां मधील मेलेल्या कोंबड्या काढून त्या गोणीत भरत असल्याचे दिसले . त्यांच्या कडे जाऊन विचारणा केली असता त्यांनी आधी सदर मेलेल्या कोंबड्या जवळच्या गटारात फेकून देत असल्याचे सांगू लागले . 

मात्र त्यातील एका कडे अधिक विचारणा केल्यावर मात्र त्याने आपण खार वरून आलो असून सदर मेलेल्या कोंबड्या वांद्रे - खार परिसरात ३० रुपयांना एक मेलेली कोंबडी प्रमाणे विकत असल्याचे सांगितले . मनसैनिकांनी या प्रकरणी उड्डाणपूल जवळच असलेल्या काशीमीरा पोलीस ठाण्यात नेले असता पोलिसांनी हा आमच्या अखत्यारीतला विषय नसून आनण व औषध प्रशासना कडे तक्रार करा असे सांगितल्याने या बाबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तां कडे ईमेल द्वारे तक्रार केल्याचे जांभळे म्हणाले .

Web Title: Sale of dead chickens in chicken supply trucks in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.