शालेय पोषण आहारातील तांदळाची काळ्या बाजाराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:43 AM2020-01-01T02:43:34+5:302020-01-01T02:43:41+5:30

१ हजार १८७ किलो वजनाचा तांदूळ जप्त

Sale of Rice Black Market in School Nutrition Diet | शालेय पोषण आहारातील तांदळाची काळ्या बाजाराने विक्री

शालेय पोषण आहारातील तांदळाची काळ्या बाजाराने विक्री

Next

मुंबई : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री करणाºया संस्थेच्या अध्यक्षांसह दुकानदारास गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून १ हजार १८७ किलो वजनाचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.|

विक्रोळी पार्कसाइटच्या हनुमाननगर येथे अंबिका धान्य भांडार दुकानात शालेय पोषण आहारातील तांदळाची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी सापळा रचला. तेव्हा शासनाच्या पोषण आहार योजनेंतर्गत शासकीय अनुदानामध्ये पुरविलेल्या २४ गोण्यांमध्ये १ हजार १८७ किलो वजनाचा तांदूळ सापडला. याची किंमत १९ हजार इतकी आहे. या तांदळाबाबत दुकानमालकाकडे चौकशी करताच, येथीलच श्रेया महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या पदाधिकाºयाकडून तो खरेदी केल्याचे त्याने सांगितले. चौकशीत संस्थेने शासनाकडून मिळणारा तांदूळ दुकानदारास विकल्याची कबुली दिली. त्यानुसार, गुन्हे शाखेने दुकानमालकासह संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाºयाला अटक केली आहे. चिंतन प्रमघर गुसाई (२४), चंद्रकांत मारुती पानसकर आणि संगीता चंद्रकांत पानसकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Web Title: Sale of Rice Black Market in School Nutrition Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.