सालेमला पॅरोल नाकारला, लग्न करण्यासाठी हवी होती सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:24 AM2018-08-08T05:24:12+5:302018-08-08T05:24:21+5:30

मुंब्रा येथील एका मुलीशी विवाह करण्यासाठी आपली पॅरोलवर सुटका करण्यात यावी, अशी विनंती १९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अबू सालेमने उच्च न्यायालयाला केली होती.

Salem denied parole, wanted to get married | सालेमला पॅरोल नाकारला, लग्न करण्यासाठी हवी होती सवलत

सालेमला पॅरोल नाकारला, लग्न करण्यासाठी हवी होती सवलत

Next

मुंबई : मुंब्रा येथील एका मुलीशी विवाह करण्यासाठी आपली पॅरोलवर सुटका करण्यात यावी, अशी विनंती १९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अबू सालेमने उच्च न्यायालयाला केली होती. मात्र, दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे सुटका केली जाऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने सालेमला दिलासा देण्यास मंगळवारी नकार दिला.
‘मी नोव्हेंबर २००५ पासून कारागृहात आहोत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून माझा पॅरोलचा अर्ज मंजूर करावा. एका महिलेला विवाहाचे आश्वासन दिल्यानंतर त्यापासून मी माघार घेऊ शकत नाही. ती महिलाही अन्य कुणाशी विवाह करू इच्छित नाही,’ असे सालेमने याचिकेत म्हटले होते. मात्र, त्याच्या याचिकेत त्याने तो विवाह कधी करणार आहे, याची तारीख जाहीर केली नव्हती.
गेल्याच वर्षी विशेष टाडा न्यायालयाने सालेमला याला भारतीय दंडसंहिता, टाडा कायदा व आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Web Title: Salem denied parole, wanted to get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.