ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६,७८४ घरांची विक्री, २०१९च्या तुलनेत यंदा १६ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:09 AM2021-09-04T04:09:32+5:302021-09-04T04:09:32+5:30

मुंबई : यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६ हजार ७८४ घरांची विक्री झाली आहे. २०१९च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये ...

Sales of 6,784 homes in Mumbai in August, up 16 per cent from 2019 | ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६,७८४ घरांची विक्री, २०१९च्या तुलनेत यंदा १६ टक्क्यांनी वाढ

ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६,७८४ घरांची विक्री, २०१९च्या तुलनेत यंदा १६ टक्क्यांनी वाढ

Next

मुंबई : यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत ६ हजार ७८४ घरांची विक्री झाली आहे. २०१९च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये घर खरेदीत १६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने रिअल इस्टेट बाजारात आनंदाचे वातावरण आहे. या घर खरेदीमुळे शासनाच्या तिजोरीत ४०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये ४ टक्के महिला घर खरेदीदार आहेत.

जुलै महिन्यातील घर खरेदीपेक्षा ऑगस्टच्या घर खरेदीमध्ये घट झाली असली तरीदेखील रिअल इस्टेट बाजारात आनंदाचे वातावरण आहे. कारण जुलै महिन्यापर्यंतची घर खरेदीची नोंदणी मार्च महिन्यातच करण्याची परवानगी दिल्याने यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत घर खरेदीमध्ये वाढ दिसून आली. यानंतर आता ऑगस्टमधील घर खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नसूनदेखील घर खरेदीने ६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेनंतर रिअल इस्टेट बाजार सावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील काळात घर खरेदीचा आलेख कसा राहील, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. घर खरेदीला पुन्हा एकदा चालना मिळावी, यासाठी विकासक मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. त्यामुळे आता सरकार यावर सकारात्मक प्रतिसाद देईल का, याकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिशिर बैजल (अध्यक्ष, नाईट फ्रँक इंडिया) - दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील घर खरेदी वाढली आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने तसेच लसीकरण प्रक्रिया जोर धरत असल्याने घर खरेदीत वाढ दिसून येत आहे. घर खरेदीचा आलेख असाच राहण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात.

अशोक मोहनानी (अध्यक्ष, नरेडको) - लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्याने आर्थिक स्थिती सुधारत आहे. मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही घर खरेदीत वाढ होणे हे कौतुकास्पद आहे. पुढील काळात घर खरेदीला अशीच चालना मिळेल, अशी आशा आहे.

Web Title: Sales of 6,784 homes in Mumbai in August, up 16 per cent from 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.