मध्य रेल्वे मार्गावर कोरोना युद्ध सामुग्री विक्रीस सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:09 PM2020-07-08T18:09:52+5:302020-07-08T18:10:16+5:30

नागपूरनंतर आता मुंबईतील स्थानकावर मास्क, रुमाल, बेड रोल आणि सॅनिटाझर दिसणार

Sales of Corona war materials begin on Central Railway | मध्य रेल्वे मार्गावर कोरोना युद्ध सामुग्री विक्रीस सुरुवात 

मध्य रेल्वे मार्गावर कोरोना युद्ध सामुग्री विक्रीस सुरुवात 

googlenewsNext

 

कुलदीप घायवट 

मुंबई : देशभरातील रेल्वे स्थानकावर मास्क, रुमाल, बेड रोल आणि सॅनिटाझर विक्रीस सुरुवात केली आहे. अनेक स्थानकावर यासाठी नवीन स्टॉल तयार करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर विभागात स्टॉल उभारून कोरोना युद्ध सामग्रीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तर, लवकरच मुंबईतील स्थानकातील मल्टिपर्पस स्टॉल, जनरल स्टोरवर  मास्क, रुमाल, बेड रोल आणि सॅनिटाझर दिसणार आहेत.  

मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर विभागातील आठ स्थानकावर कोरोना प्रतिबंधक सामग्री विकण्यास ठेवण्यात आली आहे. नागपूर, अजनी, सेवाग्राम, धामणगाव, चंद्रपूर, बल्हारशा, बेतुल, वर्धा या रेल्वे स्थानकातील  स्टॉलवर मास्क, रुमाल, पीपीई कीट, फेस शिल्ड, ग्लोज, बेड रोल,  सॅनिटाझर बाटली हि सामग्री विक्रीस ठेवली जाणार आहे. तर, मुंबईतील सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, चर्चगेट, मुंबई सेंट्रल या  स्थानकावर लवकरच हि सामग्री प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.

रेल्वे स्थानकावरील खासगी स्टॉलधारक पुस्तके, औषध, दैनंदिन वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीस मान्यता आहे. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे महामंडळाच्या सुचनेप्रमाणे रेल्वे स्थानकावर असलेल्या स्टॉलवर मास्क, रुमाल, बेड रोल, पीपीई कीट, सॅनिटाझर बाटली  यांसारख्या वस्तू विक्रीस मान्यता दिली आहे. प्रवाशांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा सामुग्रीची विक्री करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी हि सुविधा करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी सुरक्षा सामग्री आणण्यास विसरला तर, रेल्वे स्थानकावर सामग्री घेता येणार आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वातानुकूलित डब्यात मिळणारे बेड रोल देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणीला समोर जावे लागत होते. मात्र आता रेल्वे स्थानकांवरील स्टॉलवर बेड रोलसुद्धा प्रवाशांना खरेदी करता येणार आहे. रेल्वे स्थानकावर टॉवेल, नैपकीन, उशी, उशीचे कॅव्हर, रूमाल, चादर, बेट शीट सुद्धा प्रवाशांना खरेदी करता येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुरक्षा सामुग्री ही खाद्यपदार्थ स्टॉल सोडून इतर स्टॉलवर विक्री करता येणार आहे. रेल्वे महामंडळाच्या दिशानिर्देशानुसार रेल्वे स्थानकावर कोरोना सुरक्षा सामग्री प्रवाशांना किरकोळ किंमतीत उपलब्ध करून दिली आहे.  


रेल्वे स्थानकावरील क्युरीओ/ जनरल स्टॉलमध्ये मास्क आणि सॅनिटाझर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  लवकरच याची पूर्तता केली जाणार आहे.
- प्रविण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Sales of Corona war materials begin on Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.