चहा दुकानात रेल्वेच्या ई-तिकिटांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2016 03:48 AM2016-07-11T03:48:23+5:302016-07-11T03:48:23+5:30

कांदिवली येथील चहाच्या दुकानावर टाकलेल्या धाडीतून ई-तिकीट जप्त केल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला बरीच माहिती हाती लागली आणि धाडसत्र सुरू ठेवत ४७ हजार रुपये किमतीची २२ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

Sales of railway e-ticket in tea shop | चहा दुकानात रेल्वेच्या ई-तिकिटांची विक्री

चहा दुकानात रेल्वेच्या ई-तिकिटांची विक्री

Next


मुंबई : कांदिवली येथील चहाच्या दुकानावर टाकलेल्या धाडीतून ई-तिकीट जप्त केल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला बरीच माहिती हाती लागली आणि धाडसत्र सुरू ठेवत ४७ हजार रुपये किमतीची २२ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.
डॉ. दळवी रोड येथील राम टी-हाउसमधून रेल्वेच्या ई-तिकिटांची अनधिकृतरीत्या तिकीट विक्री होत असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार धाड टाकत ४ हजार १२३ रुपये किमतीचे एक ई-तिकीट, रोख ५२0 रुपये आणि एक मोबाइल जप्त केला. या वेळी रामनवल गुप्ता याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याचा मित्र जनार्दन गुप्ता हा ई-तिकिटे बुक करत असल्याचे समजले. त्यानंतर लिंक रोडवरील निकम चाळीत धाड टाकून रेल्वे पोलिसांनी ४३ हजारांची २१ ई-तिकिटे तसेच दोन लॅपटॉप आणि एक मोबाइल जप्त केला. येथे अनेक वैयक्तिक बनावट आयडीद्वारे ई-तिकिटे काढण्यात येत होती. (प्रतिनिधी)

Web Title: Sales of railway e-ticket in tea shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.