मुंबई : शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. तरीही पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नशेचे सेवन वाढत असून काही शाळांबाहेर विद्यार्थी सिगारेट ओढताना दिसत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शाळेबाहेर तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याची तक्रार शिक्षण समितीमध्ये आज करण्यात आली. दरम्यान, स्टॉलधारकांची तपासणी करून लवकरच विभागस्तरावर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.मादक पदार्थांबाबत शालेय मुलांचे समुपदेश करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला होता. यावर चर्चा करताना शाळेच्या २०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, पानाच्या विक्रीवर बंदी असताना हे पदार्थ खुलेआम मिळत आहेत. या दुकानांवर कारवाई होत नसल्याने मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत, असाआरोप नगरसेवकांनी शिक्षण समितीत केला. पालिका प्रशासनाने शाळा परिसरातील पानटपरींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी कारवाईचे आदेश दिले.सहा मुलांनी ड्रग्स घेतल्याची बाब उघडकुर्ल्यातील एका शाळेतील दात तपासणी शिबिराच्या वेळी अनेक मुलांनी गुटखा खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला होता.वडाळा परिसरात सहा मुलांनी ड्रग्स घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.घाटकोपरमध्ये चार मुले सिगारेट ओढताना रंगेहाथ पकडली गेली. यामध्ये दोन मुलींचा समावेश होता, अशी माहिती नगरसेवकांनी समितीत दिली.
तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री, सदस्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:19 AM