एनआयपीएमच्या मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी सलील देसाई यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:21+5:302021-07-09T04:06:21+5:30
मुंबई - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी सलील देसाई यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ...
मुंबई - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी सलील देसाई यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते एनआयपीएमचे उपाध्यक्ष होते. एनआयपीएमच्या मुंबई शाखेच्या कार्यकारी समितीसाठी मे महिन्यात निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये देवदत्त कल्याणकर (उपाध्यक्ष), राजेंद्र तावडे (सचिव), निखिल गदोडिया (संयुक्त सचिव), डॉ. प्रा. अरुणा देशपांडे (खजिनदार), डॉ. सुहास राव, रचना पेडणेकर आणि विलास कुलकर्णी यांचा समावेश आहे.
सलील देसाई यांना एच. आर.मध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून सध्या ते मुंबईमध्ये सॉफिटेल हॉटेल्स व रिसोर्ट्समध्ये संचालक (टॅलेंट व कल्चर) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी नोसिल, हॉटेल लीला केंपिन्स्की, एस्सेल समूह, तसेच इंटरगोल्ड (इंडिया) लिमिटेड आदी आस्थापनांमध्ये काम केले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM) ही अखिल भारतीय स्तरावर काम करणारी एच. आर., इंडस्ट्रिअल रिलेशन्स, लेबर वेल्फेअर, तसेच ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट या विषयांत काम करणाऱ्या व्यावसायिकांची संघटना आहे. तिचे मुख्यालय कोलकाता येथे असून देशभरातील ५३ शाखांमध्ये सुमारे दहा हजार सदस्य आहेत.