घालमेल : तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकारमुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा होऊन सध्या जामिनावर सुटलेला अभिनेता सलमान खान याला दुबईला जायचे आहे. यासाठी त्याने बुधवारी उच्च न्यायालयात रीतसर अर्ज केला. मात्र न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे सलमानच्या दुबईवारीचे आता काय होणार, याचा फैसला आता पुढील आठवड्यात होणार आहे. सुटीकालीन न्या. अजय गडकरी यांच्यासमोर बुधवारी दुपारी सलमानतर्फे अर्ज करण्यात आला. सलमानला व्यावसायिक कामासाठी दुबईला जायचे असून त्यासाठी त्याला परवानगी द्यावी, असे त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने अर्जदाराला शिक्षा झाली आहे का, असा सवाल केला. सलमानला शिक्षा झाल्याचे कळल्यानंतर न्यायालयाने या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. हिट अँड रन प्रकरणी सलमानला झालेल्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी येत्या १५ जून रोजी होणार आहे.सलमान खानला उच्च न्यायालयाने हिट अॅण्ड रन प्रकरणात जामीन दिला आहे. या प्रकरणी जामीन बॉण्ड भरण्यासाठी सलमान आज सत्र न्यायालयात आला होता. सलमानसाठी त्याच्या मॅनेजर रेश्मा शेट्टीने हमी दिली आहे.
दुबईसाठी सलमान कोर्टात!
By admin | Published: May 21, 2015 2:22 AM