Sridevi Funeral: श्रीदेवींचं पार्थिव पाहून रडू लागला सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 09:32 AM2018-02-28T09:32:56+5:302018-02-28T09:35:37+5:30

श्रीदेवी यांचं पार्थिव पाहिल्यावर सलमान खानला अश्रू अनावर झाले.

salman khan broke down after seeing sridevis deathbody | Sridevi Funeral: श्रीदेवींचं पार्थिव पाहून रडू लागला सलमान खान

Sridevi Funeral: श्रीदेवींचं पार्थिव पाहून रडू लागला सलमान खान

Next

मुंबई- बॉलिवूडची 'रूप की रानी' श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्रीदेवी यांची अंत्ययात्रा आजा दुपारी साडेतीन वाजता एसवी रोडवरील विलेपार्ले स्मशान भूमीत जाईल. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणलं गेलं. श्रीदेवी यांचं पार्थिव घरी आल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना कपूर परिवाराचं सांत्वन करण्यासाठी घरी हजेरी लावली होती. मंगळवारी रात्री अभिनेता सलमान खानही श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचला होता. श्रीदेवी यांचं पार्थिव पाहिल्यावर सलमान खानला अश्रू अनावर झाले. श्रीदेवींचं पार्थिव पाहून सलमान खान रडायला लागल्याची माहिती मिळते आहे. फक्त सलमान खान नाही तर श्रीदेवींच्या करोड्या चाहत्यांच्या डोळ्यात आज अश्रु आहेत. भरलेल्या डोळ्यांनी सगळेच जण श्रीदेवी यांना अखेरचा अलविदा करत आहेत. 

मंगळवारी रात्री बोनी कपूर व अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं गेलं. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी व त्यांची पत्नी टीना अंबानी उपस्थित होते. अभिनेता व श्रीदेवी यांचा दीर अनिल कपूरही एअरपोर्टवर उपस्थित होता. 

दरम्यान, श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलं आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. 

Web Title: salman khan broke down after seeing sridevis deathbody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.