Salman Khan death threat: कुणी धमकी दिली, तुझे शत्रू कोण?; सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:32 PM2022-06-07T18:32:09+5:302022-06-07T18:34:21+5:30

बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

Salman Khan recorded his statement to mumbai police over death threat | Salman Khan death threat: कुणी धमकी दिली, तुझे शत्रू कोण?; सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलं वाचा...

Salman Khan death threat: कुणी धमकी दिली, तुझे शत्रू कोण?; सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलं वाचा...

Next

मुंबई

बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी आज सलमानच्या घरी जाऊन त्याला प्राप्त झालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राच्या प्रकरणाबाबत चौकशी केली. ''तुझाही सिद्धू मुसेवाला करून टाकू'', अशा धमकीचं पत्र सलमान खानच्या बॉडीगार्डला सापडलं आहे. सलमान ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातो आणि जिथं तो आराम करण्यासाठी थांबतो नेमकं त्याच ठिकाणी धमकीचं पत्र ठेवण्यात आलं होतं. संबंधित पत्र वांद्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद करुन प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. तसंच सलमानच्या निवास्थानावरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 

सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

सलमानला देण्यात आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. यात सलमाननं पोलिसांनी विचारेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आपला कुणावरही संशय नसल्याचं म्हटलं आहे. "धमकीच्या पत्रावर माझा कुणावरही संशय नाही. सध्या माझं कुणाशी शत्रुत्व देखील नाही. मी लॉरेन्स बिश्नोईचं नाव २०१८ रोजी पहिल्यांदा ऐकलं. जेव्हा त्यानं मला मारण्याची धमकी दिली होती. गोल्डी बरार कोण आहे हे मला माहित नाही", असं सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. पोलिसांनी याआधीच याप्रकरणात सलमानचे वडील सलीम खान यांच्यासह एकूण चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांनी आज सलमान खानचाही जबाब नोंदवला आहे. 

पोलीस काय शोधत आहेत?
वांद्रे बॅंडस्टँडजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात पोलीस गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांना अद्याप ठोस काहीही मिळालेले नाही. धमकीच्या पत्रात G B L B लिहिले होते. याचा अर्थ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई, मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत आहेत. महाराष्ट्रात या दोघांच्या टोळीतील सदस्यांचा तपशील पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवली
सिद्धू मुसेवाला या पंजाबी गायकाची नुकतंच अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात आहे. पण याच ठिकाणाहून तो आपली गँग ऑपरेट करतो असं म्हटलं जातं. याच लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

"तुझा सिद्ध मुसेवाला करू", सलमान खान जिथं मॉर्निंग वॉकला थांबतो तिथंच बॉडीगार्डला सापडलं धमकीचं पत्र!

२०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. कारण गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळेच त्याने सलमान खानला काळविट शिकार प्रकरणावरुन थेट जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती. सलमान खानला जीवे मारण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्लानिंग केलं होतं. 'रेडी'  सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सने सलमान खानवर हल्ला करण्याचं प्लानिंग केलं होतं. पण त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईला त्याच्या आवडीचं शस्त्र मिळालं नव्हतं. त्यामुळे हत्येचं प्लानिंग पूर्ण होऊ शकलं नव्हतं. सिद्धू मुसेवाला प्रकरणानंतरच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पण त्यानंतर आता थेट धमकीचं पत्र सापडल्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. 

Web Title: Salman Khan recorded his statement to mumbai police over death threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.