Join us  

सलमान खानला मिळणार Y+ श्रेणीची सुरक्षा; बिश्नोई टोळीने दिली होती जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 2:00 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मुंबई:बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे. सलमानला आलेल्या धमक्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली.

सलमान खानला धमकी; लॉरेन्स बिश्नोईवर संशय, सलमानला पत्र धाडले कुणी?; शोध सुरू

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना काही दिवसापूर्वी धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्राचा संबंध गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचे आढळले होते.  पत्राची सत्यता पडताळली जात असल्याचेही पोलिसांनी नमूद केले होते. दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी केली.

सलमान खानला मिळालेले पत्र हे हिंदी भाषेत होते, या पत्राच्या शेवटी लिहिलेल्या जी.बी. आणि एल.बी. या आद्याक्षरांचा अर्थ गुंड गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असा काढला होता. लॉरेन्स बिश्नोईने २०११ च्या ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ल्याची योजना आखली होती, परंतु तो अयशस्वी झाला. त्यानंतर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याही हिटलिस्टवर सलमान असल्याचा खुलासा झाला आहे. गँगस्टर नरेश शेट्टीला अभिनेत्यावर हल्ला करण्याचे काम दिले. ब्रारच्या टोळीतील संपत नेहराने २०१८ मध्ये वांद्रे येथील सलमानच्या घराची रेकीही केली होती; तर दिल्ली पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी बिश्नोई टोळीच्या तीन शार्प शूटरना वाशी येथून अटक केली होती. 

 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडमुंबईपोलिस