सलमान खान निघाला दुबईला!

By admin | Published: May 27, 2015 01:46 AM2015-05-27T01:46:07+5:302015-05-27T01:46:07+5:30

अभिनेता सलमान खानला दुबईला जाण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सलमान दुबईला रवाना होईल.

Salman Khan went to Dubai! | सलमान खान निघाला दुबईला!

सलमान खान निघाला दुबईला!

Next

मुंबई : अभिनेता सलमान खानला दुबईला जाण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सलमान दुबईला रवाना होईल. येत्या शुक्रवारी दुबई येथे होणाऱ्या अरब इंडो बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यात तो सहभागी होणार आहे.
हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेल्या सलमानने दुबईला जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. दुबईत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे आश्वासन सलमानने आयोजकांना दिले आहे. तेव्हा तेथे जाण्यासाठी परवानगी द्यावी व याकरिता पासपोर्ट द्यावा, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती.
सुट्टीकालीन न्या. शालिनी फळसाणकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील ए.ए. माने यांनी केवळ सलमानला शिक्षा झाली असल्याचा एकच मुद्दा पुढे करत या अर्जाला विरोध केला. मात्र याआधी सलमानला परदेशवारीसाठी परवानगी मिळाली असल्याचे नमूद करत न्यायालयाने सलमानचा अर्ज मंजूर केला. २७ ते ३० मे या कालावधीसाठी ही परवानगी दिली आहे. याआधी त्याला २ लाख रुपये सत्र न्यायालयात भरावे लागणार आहेत. तसेच पासपोर्ट देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, जामीनही मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)

न्यायालयाच्या अटी
च्दुबईच्या विमानाचा नंबर, तिकीटाचा नंबर विमानाची वेळ, तेथे केव्हा जाणार व तेथून केव्हा परतणार, तेथील वास्तव्याचा पत्ता, तेथील संपर्काचा मोबाइल व लँडलाईन नंबर, तेथे कोठे तत्काळ उपलब्ध होऊ शकणार, हा सर्व तपशील सलमानने द्यावा.
च्दुबईतील भारतीय दूतावासाला तेथे पोहोचण्याची व तेथून परतण्याची माहिती द्यावी. दुबईहून परतल्यानंतर बारा तासांच्या आत पासपोर्ट पुन्हा पोलिसांकडे जमा करावा. तेथून परतल्याची माहिती उच्च न्यायालयालाही १ जूनला द्यावी.

Web Title: Salman Khan went to Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.