सलमान, तू बिष्णोई समाजाची माफी माग, भाजपच्या नेत्याची पोस्ट! सिद्दीकींच्या हत्येनंतर आवाहन; ठरला चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:45 AM2024-10-15T10:45:34+5:302024-10-15T10:46:08+5:30

  अभिनेता सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हरनाथसिंग यांनी हे आवाहन केले.  

Salman khan, you apologize to the Bishnoi community, BJP leader's post Appeal after Siddiqui's murder | सलमान, तू बिष्णोई समाजाची माफी माग, भाजपच्या नेत्याची पोस्ट! सिद्दीकींच्या हत्येनंतर आवाहन; ठरला चर्चेचा विषय

सलमान, तू बिष्णोई समाजाची माफी माग, भाजपच्या नेत्याची पोस्ट! सिद्दीकींच्या हत्येनंतर आवाहन; ठरला चर्चेचा विषय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या बिष्णोई गँगने केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार हरनाथसिंग यादव यांनी अभिनेता सलमान खाने याने बिष्णोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया व्यासपीठाद्वारे केली आहे. 
  अभिनेता सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हरनाथसिंग यांनी हे आवाहन केले.  

तो समाज काळवीटाची पूजा करतो, पण तू...
सलमान खानला इशारा देण्यासाठी बिष्णोई गँगने बाबा सिद्दीकी यांची हत्या केली, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हरनाथसिंग यादव यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. यादव यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘प्रिय सलमान खान, बिष्णोई समाज काळवीटाची पूजा करतो आणि तू त्याचीच शिकार करून त्याला शिजवून खाल्लेस. यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे बिष्णोई समाज तुझ्यावर दीर्घ काळापासून संतप्त आहे.’ 

पोस्टमधील मजकूर 
- ‘माणसे चुका करतात. तू मोठा अभिनेता आहेस. या देशातील अनेक लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात. बिष्णोई समाज ज्या काळवीटाची पूजा करतो त्याचीच तू शिकार केलीस.
- तू केलेल्या या मोठ्या चुकीसाठी तू बिष्णोई समाजाची माफी माग, असा सल्ला मी तुला देत आहे,’ असे भाजप नेते आणि माजी खासदार हरनाथसिंग यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 

Web Title: Salman khan, you apologize to the Bishnoi community, BJP leader's post Appeal after Siddiqui's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.