मुंबई : ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या खटल्यात सुनावणीआधी साक्षीदारांची यादी दिली जात नसल्याचा अभिनेता सलमान खानचा आरोप सरकारी पक्षाने सोमवारी खोडून काढला़
यासाठी सलमानने रीतसर अर्ज केला होता़ मात्र विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सलमानचा हा अर्ज तथ्यहीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े ते म्हणाले, सुनावणीआधी साक्षीदारांची यादी बचाव पक्षाला देणो सरकारी पक्षाला बंधनकारक नाही़ तरीही असा दावा बचाव पक्ष करीत असेल तर तशी कायदेशीर तरतूद सलमानने सादर करावी; आणि तशी तरतूद असल्यास सरकारी पक्ष साक्षीदारांची यादी बचाव पक्षाला देईल़
अॅड़ घरत यांनी हा युक्तिवाद केल्यानंतर सलमानने हा अर्ज मागे घेतला़ या वेळी सरकारी पक्षाने दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवली़ यांपैकी एका साक्षीदाराने अपघात झालेल्या सलमानच्या गाडीचा विमा काढला होता़ तर हा अपघात ज्या ठिकाणी झाला तेथील बेकरी मॅनेजरचीही साक्ष झाली़ यावरील पुढील सुनावणी 3 डिसेंबरला होणार आह़े