Join us

सलमान खानला धमकावणारा जोधपुरात जेरबंद; गुन्हेगार २१ वर्षांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 6:08 AM

सलमान खान याच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात ई-मेलद्वारे धमकी आली होती.

मुंबई : सुपरस्टार सलमान खान याला ई-मेलद्वारे धमकावणाऱ्यास राजस्थानातील जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव धाकद्रम बिश्नोई (२१), असे आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने रविवारी ही कारवाई केली. 

सलमान खान याच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात ई-मेलद्वारे धमकी आली होती. त्यात अटकेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा निकटचा सहकारी गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला असता संबंधित ई-मेल जोधपूर येथून पाठवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार जोधपूर पोलिसांना कळविण्यात आले.

जोधपूरमधील सियागो की धानी येथील रहिवासी धाकद्रम बिश्नोईने हा ई-मेल पाठवल्याचे अधिक तपासात उघड झाले. रविवारी जोधपूर पोलिसांनी वांद्रे पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक बजरंग जगताप यांच्यासह संयुक्तपणे आरोपींचा शोध घेतला त्यानंतर धाकद्रमला ताब्यात घेऊन ते मुंबईला रवाना झाले. धाकद्रमविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :सलमान खानअटकमुंबई