सलमानच्या वाढदिवसाचा केक ४०० फुट लांबीचा; गिनिज बुक मध्ये होणार नोंद

By admin | Published: December 27, 2015 09:28 PM2015-12-27T21:28:02+5:302015-12-27T21:28:02+5:30

वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सलमानसाठी ४०० फूट लांबीचा केक तयार केला आहे. या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार असल्याचं वृत आहे.

Salman's birthday cake is 400 feet long; Guinness Book Record Report | सलमानच्या वाढदिवसाचा केक ४०० फुट लांबीचा; गिनिज बुक मध्ये होणार नोंद

सलमानच्या वाढदिवसाचा केक ४०० फुट लांबीचा; गिनिज बुक मध्ये होणार नोंद

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सलमानसाठी ४०० फूट लांबीचा केक तयार केला आहे. या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार असल्याचं वृत आहे. त्यामुळे सलमानच्या नावावर अजून एक रेकॉर्ड होणार आहे. 
आज बॉलिवूडच्या दबगं खानचा ५०वा वाढदिवस आहे, वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहत्यांकडून तब्बल ४०० फुट लांबीचा केक तयार करण्यात आला. शनिवारी रात्री १२ वाजता चाहत्यांनी तयार केलेला ४०० फूट लांबीचा केक कापून सलमानने आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे पनवेलमधील फार्म हाऊसवर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. सिनेतारे-तारका तसेच चाहत्यांनी गर्दी केली होती, यावेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, टेनिस स्टार सानिया मिर्झा, अभिनेत्री तब्बू, फराह, अभिनेता रितेश देशमुख, पत्नी जेनेलियासह अन्य काही जण उपस्थित होते.
सलमानच्या वाढदिवसाला पार्टीला हजेरी लावणाऱ्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

सलमानसाठी हा ५० वा वाढदिवस तसा खासच आहे. यावर्षी आलेल्या त्याच्या बजरंगी भाईजान आणि प्रेम रतन धन पायो या दोन चित्रपटांनी २०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला तसेच तेरावर्षांपासून सुरु असलेल्या हिट अँण्ड रन खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली.

माझ्यासाठी २७ हे योग्य वय आहे. मला वाढत्या वयाची भिती वाटत नाही, मी नेहमीच २७ वर्षांचा राहीन. वाढत वय हा आयुष्याचा एक भाग आहे असे सलमानने वाढदिवसानंतर सांगितले.

Web Title: Salman's birthday cake is 400 feet long; Guinness Book Record Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.