सलमानच्या नातेवाइकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड

By admin | Published: September 27, 2015 05:26 AM2015-09-27T05:26:52+5:302015-09-27T05:26:52+5:30

‘दबंग’स्टार सलमान खानच्या एका नातेवाईकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड होत असल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Salman's relative doctor's raid | सलमानच्या नातेवाइकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड

सलमानच्या नातेवाइकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड

Next

मुंबई : ‘दबंग’स्टार सलमान खानच्या एका नातेवाईकाकडून डॉक्टर तरुणीची छेडछाड होत असल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुला मिर्झा खान असे त्याचे नाव असून लग्नासाठी गेल्या दीड वर्षापासून मानसिक त्रास देत असून फेसबुक व ई-मेलवरुन आपल्याबाबत अश्लिल पोस्ट केल्याची तक्रार या तरुणीने केलेली आहे. सलमान खानच्या घरी त्याच्याशी ओळख झाल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
ओशिवरा परिसरात रहात असलेली २५ वर्षाची ही तरुणी फुड एक्स्पर्ट व हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करते. गेल्यावर्षी फेबु्रवारी ते सप्टेंबर या काळात ती अभिनेता सलमान खानची सल्लागार म्हणून काम करीत होती. त्यानिमित्ताने सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी बिल्डीगमध्ये जात असताना अब्दुला मिर्झा या त्याच्या नातेवाईकाशी तिचा परिचय झाला. तो मार्केटिंगचे काम करीत असल्याने तिने तरुणीला तिच्या व्यवसायात मदत करण्याचे आश्वासन देत मैत्री केली. त्यानंतर गेल्या २९ मे रोजी त्याने आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन लग्न करण्याची मागणी केली. मात्र तिने नकार देताच मुंबईत राहू देणार नाही, तुझी बदनामी करु असे धमकाविले. तर ५ जूनला भेटण्यास येवून लॅपटॉप तोडला. त्यानंतर वारंवार फोन, ईमेलवर मॅसेज व व्हॉटसअप करुन लग्न करण्यासाठी धमकावित होता. १० सप्टेंबरला आपल्या अपार्टमेंटजवळ येवून अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर १९ सप्टेंबरला तिचे फेसबुक व ईमेल खाते हॅक करुन त्यावर बदनामीकारक पोस्ट टाकल्या.
अखेर संबंधित तरुणीने शुक्रवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात अब्दुला मिर्झा खान याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर छेडछाड, विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Salman's relative doctor's raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.