Join us

सलमानच्या ‘खास’ भेटीने तरुणाई भारावली

By admin | Published: July 24, 2014 12:03 AM

‘मेरे बारे मे इतना मत सोचना, मै दिलमे आता हूॅँ, समज मै नही..’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्याच तोंडी आहे.

मुंबई : ‘मेरे बारे मे इतना मत सोचना, मै दिलमे आता हूॅँ, समज मै नही..’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्याच तोंडी आहे. हा डायलॉग आपल्या विशिष्ट शैलीत बोलणा:या सर्वाच्या ‘हृदयाची धडकन’ असलेल्या सलमान खानला भेटण्याची संधी ‘लोकमत’तर्फे विद्याथ्र्याना देण्यात आली. निमित्त होते सलमानच्या आगामी ‘किक’ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटचे. वांद्रय़ाच्या मेहबुब स्टुडिओत या तरुणाईला बॉलीवूडच्या ‘भाई’ची भेट घेण्याची संधी मिळाली.
‘किक’मधील सुपरस्टार सलमान आणि जॅकलिन फर्नाडिस यांना पाहून तरुण-तरुणींनी एकच कल्ला केला. आपल्या चाहत्या कलाकारांना इतक्या जवळून पाहण्याची आणि त्यांच्याशी बातचीत करण्याची संधी मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते. या कार्यक्रमास लोकमत समूहाचे सहउपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते. ‘किक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियादवाला यांनी केले आहे. यात सलमानच्या सुपर स्टंटचे डिझाइन विदेशी टीमने केले आहे. त्याचे शूटिंग मिनी हेलिकॉप्टरमधून करण्यात आले आहे. 
त्याबद्दल बोलताना सलमान म्हणाला, चित्रपटाच्या अॅक्शन सेटअपसाठी साजिदला खूप मेहनत घ्यावी लागली. यात अॅक्शन स्टारप्रमाणो सादरीकरण केले आहे. मात्र या मोठय़ा कॅनव्हासला साजिदने बारकाईने तयार केले. त्यामुळे पडद्यावर दृश्यांमधील परिपूर्णता पाहता येईल. काही दृश्ये सामान्य पद्धतीनेदेखील शूट करता येत होती, पण साजिदने बजेटचा विचार केलेला नाही. या चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स सर्व काही आहे. टोटल एंटरटेनमेंट करणारा हा चित्रपट आहे. सलमानच्या अॅक्शनने भरलेला ‘किक’ साजिद नाडियादवालाचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटात त्यांनी कसलीच उणीव ठेवलेली नाही. यातील काही अॅक्शन दृश्यांचे शूटिंग हॉलीवूड चित्रपटाप्रमाणो करण्यात आले. यातील खास दृश्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शूट करण्यात आली. या दृश्यांचे चित्रीकरण दिल्ली आणि पोलंडमध्ये करण्यात आले आहे. अॅक्शनसाठी जर्मनी आणि अन्य विदेशी स्टंट डायरेक्टरच्या टीमला बोलावण्यात आले होते. 
त्यांच्यासोबत नियोजित केलेल्या दृश्यांना मिनी हेलिकॉप्टरच्या मदतीने लॉस एंजेलिसमधून बोलावण्यात आलेल्या टीमने शूट केले. चित्रपटाची अभिनेत्री जॅकलिनने सलमानसोबत काम करण्यात फार मजा आली असल्याचे सांगितले. जॅकलिन आणि सलमान ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर काम करणार आहे. हा अनुभव अभूतपूर्व असल्याचे जॅकलिनने सांगितले. बॉलीवूडमध्ये प्रवेश केला त्या वेळीच सलमानबरोबर काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते ‘किक’च्या निमित्ताने पूर्ण झाले आहे, असे जॅकलिन पुढे म्हणाली.
 
मानसोपचारतज्ज्ञ असलेली शायना (जॅकलिन) पोलंड येथील वॉरसॉ शहरात भारतीय पोलीस अधिकारी असलेल्या हिमांशूशी (रणदीप हुडा) लग्नासंदर्भात बोलणी करायला जाते. त्या दोघांमध्ये काही काळाने घट्ट मैत्री होते आणि शायना आपल्या पूर्व संबंधांबद्दल म्हणजेच तिचा विक्षिप्त प्रियकर डेव्हिल (सलमान) विषयी सांगते. 
 
त्याचा विक्षिप्त स्वभाव असूनदेखील त्यांचे प्रेम जुळते व फार सुंदर नाते असते. अचानक एके दिवशी डेव्हिल तिच्या आयुष्यातून निघून जातो तो कायमचा. त्याचवेळी हिमांशू तिला एक आनंदाची बातमी देतो. ज्या डोकेबाज चोराचा ब:याच काळापासून शोध सुरू होता त्याला पकडण्याची संधी त्याला मिळणार असल्याचे तो सांगतो.
 
हे दोघे ज्या व्यक्तींविषयी बोलत असतात ती एकच असून हा डेव्हिलच आहे, याबद्दल मात्र ही दोघेही अनभिज्ञ आहेत. आणि अचानक स्मृती हरवलेला डेव्हिल त्यांच्या आयुष्यात पुन्हा येतो. डेव्हिलच्या गूढ व रहस्यमय मिशनवर आधारित ही कहाणी आहे.
 
किकचे कलाकार
या चित्रपटात ‘हॅँगओव्हर’ हे गाणो सलमानने गायले आहे. 
ते त्याने युवांसमोर गाऊन सर्वाचे मन जिंकले. त्याचबरोबर ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर ताल धरत या कॉलेजियन्सनी डान्स केला. सलमान आणि जॅकलिन  यांच्यासह चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची साथ लाभली आहे. चित्रपटात रणदीप हुडा, नवाझुद्दीन सिद्दिकी, सौरभ शुक्ला, संजय मिश्र, अर्चना पुरन सिंग आणि नर्गीस फकरी हिने पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. तसेच मिथुन चक्रवर्ती ‘विद्वान सिंग’च्या भूमिकेत दिसणार आहे.