मुंबई : हिट अॅण्ड रन केसमध्ये उच्च न्यायालयाने सुटका केलेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला २५ हजार भरून हमीदार सादर करण्यास मंगळवारी उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली.१० डिसेंबर रोजी सलमानची हिट अॅण्ड रन केसमधून सुटका करताना न्या. ए.आर. जोशी यांनी सीआरपीसी कलम ४३७-ए अंतर्गत २५ हजार रुपयांसह हमीदार दोन आठवड्यांत सादर करण्याचा आदेश दिला. मात्र अद्याप काही प्रक्रिया बाकी असल्याने सलमानने सोमवारी उच्च न्यायालयात हमीदार सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागण्यासाठी अर्ज केला. मंगळवारी या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ठिपसे यांच्यापुढे होती. न्या. ठिपसे यांनी सलमानला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली.मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून वांद्रे येथील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीलगतच्या फुटपाथवर झोपलेल्या एका माणसाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याविरुद्ध सलमानने उच्च न्यायालयात अपील केले. या वेळी उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढत सलमानची सुटका केली.
हमीदारासाठी सलमानला मुदत
By admin | Published: January 13, 2016 1:58 AM