Join us

सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 1:34 PM

१ मेपासून एसी सलूनमध्ये  वाढत्या महागाईनुसार ५० टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच साध्या  सलूनमध्ये ३० टक्के  भाववाढ जाहीर करण्यात आली  आहे.

मुंबई: दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे सलून व ब्युटीपार्लर व्यवसायाची ३० ते ५० टक्के दरवाढ  होणार आहे. १ मेपासून हे दर लागू होणार आहेत. याबाबत सोमवारी झालेल्या सलून चालकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबई सलून ब्युटीपार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, इंधन, घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेलासह सौंदर्यप्रसाधनांचे दर वाढले आहेत. सोमवारी  झालेल्या सलून सेवकांच्या सभेत वाढत्या महागाईमुळे वाढलेला कौटुंबिक आणि व्यावसायिक खर्च व सलून सेवेचे भाव याचा योग्य तो ताळमेळ बसविण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

१ मेपासून एसी सलूनमध्ये  वाढत्या महागाईनुसार ५० टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच साध्या  सलूनमध्ये ३० टक्के  भाववाढ जाहीर करण्यात आली  आहे. 

टॅग्स :महागाईमुंबई