रविवारपासून सलून सुरू; कटिंगलाच परवानगी, दाढीला मात्र प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:10 AM2020-06-26T06:10:03+5:302020-06-26T06:10:19+5:30
ती सुरू करण्यास परवानगी देताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक कारागीर व ग्राहक यांनी करावे, अशी अटही घालण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाल्यापासून बंद असलेली महाराष्ट्रातील सर्व केश कर्तनालये येत्या रविवारपासून (२८ उघडण्यास राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र, फक्त डोक्यावरील केस कापता येतील. दाढी, फेशियल करण्यास मनाई करण्यात आली आहे. ती सुरू करण्यास परवानगी देताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक कारागीर व ग्राहक यांनी करावे, अशी अटही घालण्यात आली आहे.
केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी राज्यातील ब्युटी पार्लर्स, स्पा, जीम मात्र सुरू करण्यात येणार नाहीत. ती कधी सुरू होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्थात हातावर पोट असलेल्या केश कर्तनालयातील काही लाख कारागिरांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय सलून मालकांनाही नियमित उत्पन्न मिळू शकेल.
आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाजाच्या काही तरुणांनी आत्महत्या केली. तसेच केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्या, यासाठी आंदोलनेही केली. नाभिक सामाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यभरातील केश कर्तनालये उघडण्यास परवानगी दिल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
।ही काळजी घ्यावी लागेल
सलूनमध्ये फक्त कटिंग करता येईल.
ग्राहक व कारागिराना मास्क अनिवार्य
सलूनमध्ये गर्दी होणार नाही
याची काळजी घ्यावी
जीम, स्पा सुरू करता येणार नाही
दाढी, फेसियल करता येणार नाही.