दहिसरमध्ये शिवसेनाप्रमुखांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:38+5:302021-02-05T04:35:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दहिसर कांदरपाडा येथील स्मृतिस्तंभास मानवंदना देण्यात आली. शिवसेना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दहिसर कांदरपाडा येथील स्मृतिस्तंभास मानवंदना देण्यात आली. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पुष्पांजली अर्पण करून मानवंदना दिली. याप्रसंगी प्रभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत विभागातील विविध गृहनिर्माण संस्थांना यावेळी फळझाडांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आय.सी. कॉलनीतील गृहनिर्माण संस्थेत फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
शुभजित मुखर्जी यांच्या संकल्पतून व शिवसेना नेते ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार विभागातील १०० गृहनिर्माण संस्थेत नारळ, पेरू, फणस व आंबा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शिवसेना शाखेत दहावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या तसेच बारावीतील ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहीद तुकाराम ओंबले उद्यानात मियावाकी प्रकल्पाअंतर्गत १५०० झाडे लावण्यात आली. याप्रसंगी शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्युडीथ मेंडोसा, युवासेनेचे जितेन परमार व दर्शित कोरगावकरसहित शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.