Join us

जोगेश्‍वरीत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 01, 2023 4:44 PM

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते या छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. 

मुंबई - श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची छायाचित्रे आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याची सुवर्ण संधी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांबरोबरच मुंबईच्या विविध क्षेत्रातील श्री स्वामी भक्तांना येत्या शनिवार दि, ३ जून  ते रविवार दि,४ जून अशी देान दिवस मिळणार आहे. दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट संचलित इच्छापुर्ती गणेश मंदिरा तर्फे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा याची देही याची डोळा पहावयास मिळणार आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते या छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. 

या प्रदशर्नात अक्कलकोटस्वामी गुरूवर्यांनी विविध लिलांद्वारे १५० वर्षांपुर्वी महद्कार्य केले. त्या लीलांना साकारणारे १२५ हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचे विहंगम दर्शन तसेच सोहळा आता जोगेश्‍वरी (पूर्व ) शामनगर तलाव येथे श्रीस्वामी समर्थ समग्र दर्शन तसेच श्रीस्वामींच्या जीवनकाळाची समग्र माहिती देणारा हा अद्भूत असा दर्शन सोहळा आहे. यात श्री स्वामींची अस्सल छायाचित्रे, स्वामींचे अक्कलकोटचे अष्टविनायक व त्यांचे अक्कलकोटातील ११ मारुतींचे श्रींचे ३५ प्रमुख शिष्य व स्वामींच्या दिव्यस्पर्शित असंख्य वस्तुंचे, पादुकांचे, लीलास्थळांचे फोटो, यांचा समावेश आहे.

श्री स्वामी भक्तांना त्यांच्या मुळ स्वरुपाचे यथार्थ दर्श घडावे, यासाठी स्वामीभक्त संजय नारायण वेंगुर्लेकर हे गेली २७ वर्षे श्री स्वामींच्या अस्सल छायाचित्रांचे आणि त्या विषयीच्या ग्रंथाचे संदर्भासह संकलन करण्याचे काम करीत आहे. 

जोगेश्‍वरीच्या श्री स्वामींच्या भक्तांबरोबरच मुंबईच्या विविध भागांतील श्री स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या लीलांची माहिती याची देही याची डोळा पाहता यावी, यासाठी दुर्मिळ छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई