Join us

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? 'मशाल' चिन्ह काढून घ्या; समता पार्टीने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:33 AM

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं.

मुंबई- काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे, आता ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याची मागणी करणार असल्याचे समता पार्टीने म्हटले आहे. 

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला तात्पुरते मशाल हे चिन्ह दिले होते. समता पक्षाने २००४ ला रजिस्ट्रेशन केलं होतं. तेव्हा या पक्षाला मशाल हे चिन्ह दिले होते, तेव्हापासून या पक्षाने हे चिन्ह वापरले नव्हते. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिले होते. आता हे चिन्ह समता पक्षालाच मिळावे यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी निवेदन दिले आहे. 

काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मशाल चिन्ह जाण्यासंदर्भात भिती व्यक्त केली होती. समता पक्षाने अंधेरी पोटनिवडणुकीवेळी सुप्रिम कोर्टात धाव गेतली होती. यावेळी कोर्टाने त्यांचा दावा फेटाळला होता. आता धनुष्यबाण चिन्हाचा निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर मशाल चिन्ह कायमस्वरुपी देण्याच्या भितीने समता पार्टीने निवडणूक आयोगाला निवेदन देऊन मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी केली.  

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 'शिवसेना' हे नाव अन् 'धनुष्यबाण' शिंदे गटाला!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे.

शिवेसेनेत (Shiv Sena) बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती.  या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना