'राज ठाकरेंनी हिंमत असेल तर इतिहास अभ्यासक बोलवून चर्चा करावी', संभाजी ब्रिगेडचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:59 PM2021-08-18T12:59:07+5:302021-08-18T13:00:01+5:30
संभाजी ब्रिगेड आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीय. संभाजी ब्रिगेडचे नेते अॅड.मनोज आखरे यांनी आता थेट राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे.
संभाजी ब्रिगेड आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीय. संभाजी ब्रिगेडचे नेते अॅड.मनोज आखरे यांनी आता थेट राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी त्यांच्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणावेत, आम्ही आमचे इतिहास अभ्यासक आणू आणि जाहीर चर्चा घडवून आणू, असं मनोज आखरे म्हणाले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या या विधानामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. (Sambhaji Bridged challenge MNS chief Raj Thackeray to open discussion on history)
“राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावं, तरच...”; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा खोचक सल्ला
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलं होतं. यात त्यांनी इतिहासाचा आधार घेतला होता. राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंनी त्यांचे प्रबोधनकारांचे लिखाण नीट वाचावं. त्यांचं लिखाण राज ठाकरेंना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असा खोचक टोला लगावला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं भेट म्हणून पाठवणार असल्याचं म्हटलं होतं.
“लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा
त्यात आता मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या मनोज आखरे यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. "राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यास, संशोधक घेऊन चर्छा करावी. सत्य इतिहासाचे दर्शन करावं. त्यात संदर्भ व पुराव्यासह मांडणी होईल. उगाच मुक्ताफळं उधळून राज्याला वेठीस धरू नये", असं मनोज आखरे म्हणाले.