Sanjay Raut: 'छत्रपती घराण्याचा मान राखूनच संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला'; संजय राऊतांचं स्पष्टीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:51 PM2022-05-24T12:51:05+5:302022-05-24T13:41:39+5:30

संभाजीराजेंच्या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

Sambhaji Raje Chhatrapati proposed Rajyasabha candidature out of respect for Chhatrapati family; Shivsena MP Sanjay Raut's explanation! | Sanjay Raut: 'छत्रपती घराण्याचा मान राखूनच संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला'; संजय राऊतांचं स्पष्टीकरण!

Sanjay Raut: 'छत्रपती घराण्याचा मान राखूनच संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला'; संजय राऊतांचं स्पष्टीकरण!

Next

मुंबई-  राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील तिढा कायम आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सोमवारी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर आज पुन्हा संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांनी याआधी माध्यमांशी संवाद साधत मोजकीच प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा असल्याचं, मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झालीय. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते अपक्ष लढणार आहेत, अशी माहिती अजूनही आमच्याकडे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखूनच त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, असं संजय राऊतांनी सांगितलं.

Sambhaji Raje : संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा; मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुंबईकडे रवाना, सर्वांचं लागलं लक्ष

शिवसेनेकडे दोन जागा जिंकून येण्याची हिंमत आहेत आणि आम्ही दोन्ही जागा जिंकू, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची नावं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: जाहीर करणार असल्याची माहिती देखील संजय राऊतांनी यावेळी दिली. 

संभाजीराजे यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत आता पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे आजच मुंबईत दाखल होणार आहेत. 

"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"

दरम्यान, संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश केल्यास उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. शिवबंधन बांधण्यासाठी ‘मातोश्री’वर या, असा निरोपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने संभाजीराजे यांना दिला होता. त्यासाठी दुपारी साडेबारापर्यंतची मुदतही दिली होती. संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश न केल्यास सायंकाळपर्यंत शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करील, असेही सांगितले होते. संभाजीराजे यांनी सोमवारी मात्र ‘मातोश्री’वर न जाता कोल्हापूरला जाणे पसंत केले होते.

Web Title: Sambhaji Raje Chhatrapati proposed Rajyasabha candidature out of respect for Chhatrapati family; Shivsena MP Sanjay Raut's explanation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.