समीर दिघे मुंबई संघाचे प्रशिक्षक

By admin | Published: June 3, 2017 03:21 AM2017-06-03T03:21:10+5:302017-06-03T03:21:21+5:30

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची निवड केली. यंदा

Sameer Dighe Mumbai team coach | समीर दिघे मुंबई संघाचे प्रशिक्षक

समीर दिघे मुंबई संघाचे प्रशिक्षक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची निवड केली. यंदा रणजी विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलेले चंद्रकांत पंडित यांची जागा घेण्यास दिघे यांच्यासह माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांचेही नाव मुंबई प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते.
मुंबई क्रिकेट संघटनेने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ‘समीर दिघे यांना २०१७-१८ मोसमासाठी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले आहे.’ मुंबई निवड समितीचे प्रमुख आणि माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीने घेतलेल्या बैठकीमध्ये ४८ वर्षीय दिघे यांची प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, समीर दिघे यांच्याकडे
अव्वल दर्जावर प्रशिक्षण देण्याचा कोणताही अनुभव नाही. दिघे यांनी २००० ते २००१दरम्यान सहा कसोटी सामन्यांत आणि २३ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.
‘मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदी माझी निवड होणे ही सन्मानाची बाब आहे. मात्र, ही जबाबदारी तेवढीच आव्हानात्मकही आहे,’ अशी प्रतिक्रिया मुंबईचे नवनियुक्त प्रशिक्षक समीर दिघे यांंनी दिली. कर्णधारपदी असताना मुंबईला रणजी चॅम्पियन बनवल्यानंतर, आपल्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान दिघे यांच्यापुढे असेल.


समीर दिघे यांनी ११ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमक दाखवली.
दिघे यांनी १९९९-२००० दरम्यान मुंबई रणजी विजेत्या संघाचे नेतृत्व केले.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून दिघे यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

Web Title: Sameer Dighe Mumbai team coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.