मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सातत्याने आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) याच्या मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केल्यानं हे प्रकरण सगळीकडे गाजत आहे.
त्यातच मलिक यांनी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करत NCB च्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उभे केले आहेत. त्यात आता समीर वानखेडे यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे. साक्षीदाराने केलेल्या आरोपावर समीर वानखेडे सेशन कोर्टात गेलेत. त्याठिकाणी वानखेडे यांनी प्रभाकर साईलने कोर्टात तक्रार का केली नाही? असं म्हटलं आहे. प्रभाकर साईलनं २२ दिवसांनी हा आरोप का केला? असा सवाल समीर वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत विचारला आहे.
तसेच वारंवार माझ्यावर वैयक्तिक हल्ले करण्यात येत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यावर राजकीय पक्षाचा दबाव आहे. माझ्यावर चुकीचे आरोप करुन बदनामी केली जातेय. ज्या महिलेसोबत माझा घटस्फोट झालाय तिच्यासोबतचा फोटो कुणाच्या परवानगीने व्हायरल करण्यात आले? एका घटस्फोटित महिलेलाही सोडलं गेलं नाही. इतक्या खालच्या पातळीवर आरोप होत आहेत असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर जुन्या लग्नाचा फोटो व्हायरल
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखल्याचा फोटो व्हायरल केला आहे. त्यात येथूनच फसवणूक सुरु झाल्याचं म्हटलं आहे. या दाखल्यावर समीर वानखेडे एका मुस्लीम कुटुंबाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवली असल्याचं त्यात म्हटलं आहे. तर दुसरा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात समीर वानखेडेचं पहिलं लग्न असल्याचं सांगितले आहे. या फोटोत समीर वानखेडेची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरैशी आहे. क्रांती रेडकर ही दुसरी पत्नी आहे. २००६ मध्ये हे लग्न झालं होतं असा आरोप करण्यात आला आहे.
प्रभाकर साईलचा दावा
किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारीपूर्वी गोसावीला कोऱ्या कागदावर सही करण्यासाठी मजबूर केले. क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही. परंतु या कोऱ्या कागदाचा वापर आर्यन प्रकरणात वापरण्यात आला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील १८ कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. पूजा फोन उचलत नव्हती असंही संवादात म्हटलं गेले आहे.
संबंधित बातम्या
'त्या' लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचं मोजक्या शब्दात उत्तर; मलिकांच्या आरोपांनी पुन्हा धुमशान
आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचा बॉम्ब फुटला; समीर वानखेडेंना मिळणार होते ८ कोटी? मोठा दावा