Join us

Sameer Wankhede : "मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग माझा मुलगा मुस्लीम कसा असेल?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 2:56 PM

मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(Kranti Redkar) म्हणाल्या की, जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही

ठळक मुद्देआता, वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनीही आरोप फेटाळले असून नवाब मलिक यांना समजत कसं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी जन्मापासून दलित आहे, माझे आजोब-पणजोबा हिंदू होते, मीही हिंदूच कुटुंबात जन्मलो

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. मलिक यांनी समीर वानखेडेमुस्लीम असल्याचा मुद्दा उपस्थित केला असून समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मलिक यांचे आरोप फेटाळले असून आपण हिंदू, दलित असल्याचं म्हटलं आहे. माझं नाव ज्ञानदेव वानखेडे असून लहानपणापासूनच्या माझ्या कागदपत्रांवरही तेच नाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(Kranti Redkar) म्हणाल्या की, जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावं. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे त्याने असंच वाटतं मंत्रिपदाची काही देणंघेणं नाही असं तिने म्हटलं आहे.

आता, वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनीही आरोप फेटाळले असून नवाब मलिक यांना समजत कसं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी जन्मापासून दलित आहे, माझे आजोब-पणजोबा हिंदू होते, मीही हिंदूच कुटुंबात जन्मलो. मग, माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होईल, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टच सांगितले. तसेच, नवाब मलिक यांचा जावई तुरुंगात असल्यामुळेच त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. त्यांच्याकडून आमच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला जात आहे. त्यामुळे, आम्ही त्यांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करू, असेही वानखेडे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :समीर वानखेडेमुस्लीमनवाब मलिक