Nawab Malik: “माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”, नवाब मलिकांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:05 AM2021-10-29T11:05:05+5:302021-10-29T11:05:35+5:30

Nawab Malik vs Sameer Wankhede: या प्रकरणात महिलेचे फोटो सार्वजनिक करण्याच्या आरोपावर नवाब मलिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Sameer Wankhede: “I got the photo at 2 am; Made public only permission of woman Says Nawab Malik | Nawab Malik: “माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”, नवाब मलिकांचं स्पष्टीकरण

Nawab Malik: “माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”, नवाब मलिकांचं स्पष्टीकरण

Next

मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात मंत्री नवाब मलिकांनीसमीर वानखेडे यांच्यावर आरोप करत या प्रकरणात काशिफ खानला का सोडण्यात आलं? असा सवाल केला आहे. काशिफ हा समीर वानखेडेंचा मित्र असल्याने NCB अधिकाऱ्यांना कारवाईपासून रोखलं गेले असा आरोप मंत्री मलिकांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. नवाब मलिकांनी(Nawab Malik) वानखेडेंच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपा नेत्यांना आता तोंड दाखवायलाही जागा उरली नाही अशा शब्दात टीकास्त्र सोडलं आहे.

या प्रकरणात महिलेचे फोटो सार्वजनिक करण्याच्या आरोपावर नवाब मलिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि त्यांच्या पहिल्या पत्नी यांच्या निकाहाचा फोटो परवानगीनेच जाहीर केल्याचं म्हटलं आहे. विना परवानगी काहीही केले नाही. माझ्याकडे रात्री २ च्या सुमारास ते फोटो आले होते. फोटो पाठवणाऱ्या महिलेने मला हे फोटो सार्वजनिक करण्यास सांगितले. परंतु समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केलेल्या आरोपावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास मलिकांनी नकार दिला.

NCB डीजीला पुन्हा पत्र लिहिलं

नवाब मलिक म्हणाले की, मी एनसीबीच्या(NCB) महासंचालकांना पुन्हा पत्र लिहिलं आहे. पत्रात ज्या २६ प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला होता. त्याबद्दल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणांचा पुन्हा तपास करुन निर्दोष व्यक्तींना फसवण्यात आलं त्यांना न्याय मिळावा. मुंबईच्या जेलमध्ये १०० हून अधिक निर्दोष बंद आहेत. खोट्या आरोपाखाली या लोकांना अटक केली आहे. त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी फसवलं आहे त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी नवाब मलिकांनी केली आहे.

कोण आहे तो दाढीवाला?

मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीत(Mumbai Cruise Drugs Party) सहभागी असणारा दाढीवाला हा फॅशन टीव्हीचा प्रमुख काशिफ खान आहे. हाच ड्रग्ज माफिया समीर वानखेडेचा मित्र आहे. देशभरात हा ड्रग्ज विकतो आणि सेक्स रॅकेट चालवतो. मुंबई क्रुझवरील ६ वाजून २३ मिनिटांचा एक व्हिडीओ माझ्याकडे आहे. त्यात काशिफ खान त्याच्या प्रेयसीसोबत डान्स करताना दिसत आहे. मुंबई क्रुझवर अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. त्यातील एक काशिफ खानने केले होते. काशिफ देशभरात कार्यक्रम आयोजित करतो त्यात ड्रग्जचा धंदा चालतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

Web Title: Sameer Wankhede: “I got the photo at 2 am; Made public only permission of woman Says Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.