‘त्या’ बारचे मालक समीर वानखेडे? नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:00 PM2021-11-19T12:00:17+5:302021-11-19T12:00:34+5:30

एका रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. 

sameer wankhede replied to nawab malik over owned bar and restaurant in vashi navi mumbai | ‘त्या’ बारचे मालक समीर वानखेडे? नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक दावा

‘त्या’ बारचे मालक समीर वानखेडे? नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक दावा

Next

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला झालेल्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत आहेत. साधारण दररोज एखादा नवीन आरोप किंवा दावा नवाब मलिक यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे. यातच आता एका रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. 

एका रिपोर्टनुसार, नवी मुंबईतील वाशी येथे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सद्गुरू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला असून, ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र 

नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर सद्गुरू रेस्ट्रो बारचा फोटो शेअर केला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच २००६ पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोपही केले जात आहेत. अशातच समीर वानखेडेंविरोधात आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या एका २० वर्षीय तरुणाने वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. व्यक्तिगत वादातून वानखेडे यांनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी हे सगळे केल्याचा मोठा दावा झैद राणा याने केला आहे. 
 

Web Title: sameer wankhede replied to nawab malik over owned bar and restaurant in vashi navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.