Nawab Malik: “ड्रग्ज प्रकरणात तरी हिंदु-मुस्लीम करणं बंद करा; ‘त्या’२६ प्रकरणात २५ आरोपी मुस्लीम”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:06 PM2021-10-26T13:06:14+5:302021-10-26T13:07:42+5:30

Nawab malik vs Sameer Wankhede: मलिकांनी वानखेडेंवर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत बॉलिवूड कलाकारांमध्ये दहशत पसरवून त्यांच्याकडून वसुली करत असल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

Sameer Wankhede : “Stop doing Hindu-Muslim even in drug case BJP Mohit Bhartiya Target Nawab Malik | Nawab Malik: “ड्रग्ज प्रकरणात तरी हिंदु-मुस्लीम करणं बंद करा; ‘त्या’२६ प्रकरणात २५ आरोपी मुस्लीम”

Nawab Malik: “ड्रग्ज प्रकरणात तरी हिंदु-मुस्लीम करणं बंद करा; ‘त्या’२६ प्रकरणात २५ आरोपी मुस्लीम”

googlenewsNext

मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर NCB ने छापेमारी करत कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली आहे. परंतु एनसीबीच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी प्रश्चचिन्ह निर्माण करत थेट NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत.

मलिकांनी वानखेडेंवर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत बॉलिवूड कलाकारांमध्ये दहशत पसरवून त्यांच्याकडून वसुली करत असल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सध्या वानखेडे आणि मलिक यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं असून या प्रकरणात मलिकांनी भाजपाच्या मोहित भारतीय (Mohit Bhartiya) यांचंही नाव घेतलं होतं. आता मोहित भारतीय यांनी माझ्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला ड्रग्जमाफिया आणि नवाब मलिकांपासून धोका आहे असा आरोप करत सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.   

मोहित भारतीय यांनी ट्विटमधून मलिकांनी जाहीर केलेल्या निनावी पत्राचाही समाचार घेतला आहे. त्या निनावी पत्राचा वापर करून समीर वानखेडेंवर २६ प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. या २६ प्रकरणातील २५ आरोप मुस्लीम आहेत. कमीत कमी ड्रग्ज प्रकरणात हिंदु-मुस्लीम बंद करा. आणखी किती खालच्या पातळीला जाणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच स्वत:ला आणि जावयाला वाचवण्यासाठी स्वत:चं पत्र पाठवून स्वत:लाच लिहिलं आहे असा टोलाही मोहित भारतीय यांनी लगावला आहे.

काय आहे निनावी पत्रात?

नवाब मलिक यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलंय की, बॉलिवूडमधील कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात येते. त्यात अस्थाना यांचाही हिस्सा असतो. या कलाकारांकडून वकील अयान खान पैसे जमा करतात. अयाज खान आणि समीर वानखेडे यांची मैत्री आहे. कुठल्याही परमिशनशिवाय अयाज खान NCB कार्यालयात ये-जा करत असतात. अयाज खान समीर वानखेडे यांना मासिक वसुली करुन देत असतो. बदल्यात कुठल्याही बॉलिवूड कलाकाराला पकडलं तर अयाज खानला वकील बनवण्यास भाग पाडतो. समीर वानखेडे हा मीडियात झळकण्यासाठी काम करतो. ज्यासाठी त्याने अनेक निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्याखाली अडकवलं आहे. खोटे गुन्हे बनवण्यासाठी समीरनं स्वत:ची वेगळी टीम बनवली आहे. यात विश्व विजय सिंह, आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, सुधाकर शिंदे, OTC कदम, शिपाई रेड्डी, पीडी मोरे आणि विष्णू मीना, विजय अनिल माने, समीरचे खासगी सचिव शरद कुमार यांचाही समावेश आहे.

हे सर्वजण कुणाच्या घरी सर्च करताना कमी ड्रग्ज आढळलं तर वास्तविक प्रमाण न दाखवता जास्त प्रमाण दाखवून आर्थिक व्यवहार केले जात होते. ज्यामुळे त्या आरोपीला जामीन मिळू शकत नाही. IO आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, सुधाकर शिंदे बनावट पंचनामा बनवायचे. NCB ऑफिसमध्ये पंचनामा लिहिला जायचा तो मनमर्जीप्रमाणे बनवायचे. समीर वानखेडे त्याच्या माणसांकडून ड्रग्ज खरेदी करायचा आणि खोटे गुन्हे बनवायचे. यात दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद शेख, नासिर, आदिल उसमानी यांचा समावेश होता. ते समीरला ड्रग्ज पुरवायचे. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी समीर सीक्रेट सर्व्हिस फंड आणि लोकांच्या घराची तपासणी करताना जमा केलेले पैशांचा वापर करायचा. इतकचं नाही तर समीर आणि त्याची मंडळी कुणाच्या घरात चेकिंग करताना ड्रग्ज ठेवायचे आणि पकडून खोटे गुन्हे नोंद करायचे. हे पत्र NCB मध्ये काम करणाऱ्यानेच लिहिलं असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे.

Web Title: Sameer Wankhede : “Stop doing Hindu-Muslim even in drug case BJP Mohit Bhartiya Target Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.