Join us

वानखेडेंच्या बारला उत्पादन शुल्क विभागाची कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:12 PM

मंगळवारी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना नोटीस बजावून माहिती लपविल्याचा खुलासा मागितला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसीमधील बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांच्या नावे या बारचा परवाना घेतल्याचा आरोप गेल्या महिन्यात केला होता. त्यानंतर मंगळवारी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना नोटीस बजावून माहिती लपविल्याचा खुलासा मागितला आहे.क्रूजवरील ड्रग्ज पार्टीनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांचा भडिमार केला होता. त्यातच मलिक यांनी वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांच्या नावे एपीएमसीमध्ये बार असल्याचा उलगडा केला होता. त्यानंतर एपीएमसीमधील सद्गुरू हा परमिट रूम बार समीर वानखेडे यांच्या नावे असल्याचे समोर आले. 

वानखेडे यांच्या वडिलांनी १९९७ साली समीर वानखेडे हे १७ वर्षांचे असताना त्यांच्या नावे या बारचा परवाना काढला. याबाबत  ज्ञानदेव वानखडे यांनी सांगितले की, हे सर्व कशासाठी सुरु आहे हे सर्वाना माहिती आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून त्यानुसार सर्व यंत्रणाना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :समीर वानखेडे