मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करने सचिन वाझेंबाबत केला खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:05 PM2021-03-13T23:05:38+5:302021-03-13T23:08:15+5:30

Samit Thakkar made a sensational claim about Sachin Vaze : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत समीत ठक्करने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला लागणार नवे वळण

Samit Thakkar, who made controversial remarks against the Chief Minister, made a sensational claim about Sachin Vaze | मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करने सचिन वाझेंबाबत केला खळबळजनक दावा

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करने सचिन वाझेंबाबत केला खळबळजनक दावा

googlenewsNext

मुंबई - मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या झालेल्या संशयास्पद मृत्युमुळे सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप होत असून, वाझे यांना राज्य सरकार वाचवत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधा केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे कारवाई झालेला नेटिझन्स समीत ठक्कर याने सचिन वाझे यांच्यााबाबत खळबळजनक दावा केला आहे. (Samit Thakkar, who made controversial remarks against the Chief Minister, made a sensational claim about Sachin Vaze)

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये समीत ठक्कर म्हणतोय की,  पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीडीआरवरून ते मनसुख हिरेन यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील एका नेत्याच्या सातत्याने संपर्कात होते. सचिन वाझे आणि या नेत्यामध्ये टेलिग्रामवरून चॅटींगही झाले आहे. सध्यातरी मी तो नेता विद्यमान आमदार असल्याचे सांगू शकतो. कारण मला माझ्यावर आणखी गुन्हा नकोय. याबाबत एनआयए चौकशी करत आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, असे समीत ठक्करने म्हटले आहे. 


 
दरम्यान, समीत ठक्करने केलेल्या ट्विटमुळे राज्यातील नेता असल्याचा दावा करण्यात येत असलेला तो आमदार कोण, तसेच सचिन वाझे यांचे त्या नेत्यासोबत कोणत्या प्रकारचे संबंध होते, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.  

दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे  आणि एका शिवसेना नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. असा गौप्यस्फ़ोट शनिवारी ठाण्यात केला होता. मनसूख हिरेन यांच्या कुटुंबीयांची सोमय्या यांनी शनिवारी तिसऱ्यांदा भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हें सांगितलं. वाझे हा मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांचा प्रवक्ता असल्याने त्याला वाचविल जातं असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. 

Web Title: Samit Thakkar, who made controversial remarks against the Chief Minister, made a sensational claim about Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.