'लोकशाहीर पठ्ठे बापूराव कलादालनासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:19 PM2019-02-04T15:19:57+5:302019-02-04T15:20:47+5:30
मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनातर्फे ‘लोकशाहीर पठ्ठे बापुराव’ यांच्या नावे सुरू करण्यात येणार्या कलादालनासाठी रुपये 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, असे पत्र गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनातर्फे ‘लोकशाहीर पठ्ठे बापुराव’ यांच्या नावे सुरू करण्यात येणार्या कलादालनासाठी रुपये 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, असे पत्र गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी अंतर्गत 2007 पासून शाहीर अमरशेख अध्यासन कार्यरत असू महाराष्ट्रातल्या अस्तंगत होत चाललेल्या लोककला प्रकारांचे जतन, संवर्धन आणि संशोधन या अध्यासनातर्फे सुरू आहे. शाहीर अमरशेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रावेळी त्यांच्या नावे एक भव्य, असे कलादालन सुरू करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला होता.
त्यानुसार तसा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने तयार करुन तो शासनास सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्या होत्या. अस्तंगत होत चाललेल्या लोककलांच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच भावी पिढीपर्यंत या कला पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे कलादालन निश्चितच मोलाची भूमिका बजावले, यात शंका नाही. विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने सदर प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे सादर केला आहे. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या नावाने कलादालन सुरू करण्यासाठी आवश्यक रुपये ५ कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावस आपण मंजूर द्यावी, अशी विनंती राज्यमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.