एसटी महामंडळास एक हजार कोटींचे अर्थसाहाय्य मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:16 AM2020-12-04T04:16:36+5:302020-12-04T04:16:36+5:30

वेतनासाठी मिळणार एप्रिलपर्यंत मदत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे ...

Sanction of Rs.1000 crore to ST Corporation | एसटी महामंडळास एक हजार कोटींचे अर्थसाहाय्य मंजूर

एसटी महामंडळास एक हजार कोटींचे अर्थसाहाय्य मंजूर

Next

वेतनासाठी मिळणार एप्रिलपर्यंत मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२० अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात १२० कोटी इतका निधी आकस्मिकता निधीमधून अग्रीम म्हणून मंजूर करण्यात आला होता. ही अग्रीम रक्कम वजा करून उर्वरित ८८० कोटी रुपये ६ मासिक हप्त्यांत एसटी महामंडळास अदा करण्यात येतील. ही रक्कम हिवाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणी म्हणून मंजूर करण्यात येईल.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ९९ हजार ७८७ एवढी असून विविध प्रवासी वर्गाला प्रवास भाड्यात सवलतीपोटी शासनाकडून महामंडळास १७०० कोटी रुपये देण्यात येतात. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर आणि ३२ टक्के खर्च इंधनावर होतो. २३ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने एसटी महामंडळाची वाहतूक सेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले होते. अद्यापही जनतेच्या मनात असलेल्या भीतीमुळे प्रवासी संख्या मर्यादितच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा लक्षात घेऊन हे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

....................

Web Title: Sanction of Rs.1000 crore to ST Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.